पुरी जगन्नाथ मंदिरात बलपूर्वक घुसल्या अहिंदु महसूल अधिकारी रेश्मा लखानी !

रेश्मा यांना नियम सांगण्याचा प्रयत्न करणार्‍या अधीक्षकांचे त्यांनी केले स्थानांतर !

अधिकारी रेश्मा लखानी

पुरी (ओडिशा) – येथील आय.आर्.एस्. (भारतीय महसूल सेवा) अधिकारी रेश्मा लखानी यांनी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात बलपूर्वक प्रवेश केला. या वेळी अधीक्षक रोशन यादव यांनी त्यांना या मंदिरात अहिंदूंना प्रवेश वर्ज्य असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केल्यावरही रेश्मा यांनी त्यांचे ऐकले नाही आणि मंदिरात प्रवेश केला. तसेच नंतर रोशन यादव यांचे पुरी येथून ४०० किलोमीटर अंतरावर स्थानांतर केले. ही माहिती उघड झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्याकडे रेश्मा लखानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

अहिंदूंना प्रवेश नसणार्‍या मंदिरात बलपूर्वक घुसणार्‍या अशा अधिकार्‍यांना नोकरीवरून काढून टाकले पाहिजे ! हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षाही झाली पाहिजे !