भ्रमणभाष संच भारित करण्यास लावून बोलत असतांना झालेल्या स्फोटात वृद्धाचा मृत्यू

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथील बडनगरमध्ये भ्रमणभाष संच भारित करण्यासाठी लावून त्यावरून बोलत असतांना त्याचा स्फोट झाला. यात ६८ वर्षीय दयाराम बारोड या वृद्धाचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, बारोड यांच्या डोक्यापासून छातीपर्यंतच्या भागाच्या चिंधड्या उडाल्या.

भ्रमणभाष संचाचा स्फोट होऊ नये; म्हणून हे करा !

१. स्मार्टफोनमध्ये खूप ॲप्स आणि मजकूर असेल, तर भ्रमणभाष संच लवकर गरम होऊ लागतो. त्यामुळे मेमरी ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत मोकळी ठेवा.

२. खरेदीच्या वेळी भ्रमणभाष संचासमवेत आलेला चार्जर मूळ आहे. बनावट चार्जरमुळे बॅटरी खराब होऊन ती लवकर गरम होऊ लागते.

३. भ्रमणभाष भारित होत असतांना गेम खेळू नका किंवा त्यावरून बोलू नका.

या संदर्भात तज्ञ विकी अद्यानी यांनी सांगितले की, चार्जिंगच्या वेळी भ्रमणभाषमध्ये रासायनिक पालट होतात आणि या काळात त्यावरून बोलणे किंवा गेम खेळल्याने बॅटरी गरम होते आणि तिचा स्फोट होतो.