समृद्धी महामार्गावरील ठिकाणांची नावे मराठीत द्यावीत ! – आमदार अजय चौधरी

आमदार अजय चौधरी

मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – मराठी भाषाभवनाचे भूमीपूजन होऊनही अद्याप कामाला प्रारंभ झालेले नाही. समृद्धी महामार्गावरील ठिकाणांची नावे हिंदी आणि इंग्रजी यांमध्ये आहेत. समृद्धी महामार्गावरील पाट्या मराठीत लावण्यात याव्यात, अशी मागणी  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी माहितीच्या सूत्राखाली विधानसभेत केली.