मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – कांदा, लसूण, कापूस यांना भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत विरोधकांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन केले. गळ्यात कांदा-लसूण यांच्या माळा घालत विरोधकांनी सरकारचा धिक्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे आमदार आंदोलनात सहभागी झाले होते. अन्य शेती उत्पादनांना भाव मिळावा, अशी मागणी विरोधकांनी केली.
Mumbai NCP Protest : गळ्यात कांद्याच्या, कापसाच्या माळा, विधानभवनात राष्ट्रवादीच्या आमदारांकडून आंदोलनhttps://t.co/heglSOtpCz#nashik #nashiknews #mumbai #BudgetSession
— ABP माझा (@abpmajhatv) February 28, 2023