लोकांचा बुद्धीभेद करून त्यांना आतंकवादी कारवायांत ओढणार्‍यांपासून ब्रिटनला धोका !

ब्रिटीश सरकारच्या समितीच्या अहवालातील माहिती

लंडन – ब्रिटनला केवळ आतंकवादी संघटनांपासूनच धोका नाही, तर स्वतः प्रत्यक्ष हिंसक कृत्यांत सहभागी न होता लोकांचा बुद्धीभेद करून त्यांना आतंकवादी कारवायांत ओढणार्‍यांपासून धोका आहे, असा निष्कर्ष येथे ब्रिटीश सरकारच्या एका समितीने सिद्ध केलेल्या अहवालात मांडण्यात आला आहे. हा अहवाल ३ वर्षांच्या सखोल अभ्यासाअंती सिद्ध करण्यात आला आहे.

या अहवालात तालिबानसारख्या इस्लामी आतंकवाद्यांच्या पाठीशी उभे रहाणार्‍या, तसेच त्यांचे सातत्याने समर्थन करणार्‍या डाव्या विचारसरणीच्या संघटनांवरही आसूड ओढले आहेत. या संघटनांशी ब्रिटीश सरकारने संबंध तोडण्याची सूचनाही या अहवालात करण्यात आली आहे. या अहवालातील सर्व ३४ शिफारसी ब्रिटीश सरकारने स्वीकारल्या आहेत.

काश्मीरविषयी केल्या जाणार्‍या विधानांमुळे ब्रिटनमधील हिंदूंच्या सुरक्षेला धोका !

ब्रिटनमध्ये श्रद्धास्थानांच्या अवमानावरून होणार्‍या आक्रमणांविषयीही या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काश्मीरविषयी केल्या जाणार्‍या विधानांमुळे हिंदूंच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो, तसेच त्यांच्याविरुद्ध हिंसा वाढते. श्रद्धास्थानांच्या अवमानावरून लोकांना चिथावणार्‍या मौलानांचा ब्रिटनमध्ये भारतद्वेष पसरवण्यात हात असतो. ब्रिटनमधील आतंकवादी कारवायांत तेच लोक सहभागी असतात, जे काश्मीरमधील आतंकवादी कारवायांत सहभागी असतात, असे निरीक्षणही या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

खलिस्तानी आतंकवाद, हा ब्रिटीश साम्राज्यासाठी धोका !

ब्रिटनमध्ये वाढणारा खलिस्तानी आतंकवादही ब्रिटीश साम्राज्यासाठी मोठा धोका आहे, असे या अहवालात म्हटले आहे.