तुर्कीये आणि सीरिया येथे पुन्हा भूकंप : ५ जणांचा मृत्यू

अंकारा (तुर्कीये) – तुर्कीये आणि सीरिया येथे पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ६.४ इतकी होती. त्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून २९४ जण घायाळ झाले आहेत. ६ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या भूकंपानंतर हा भूकंप झाला. या मधल्या काळातही येथे भूकंपाचे अल्प तीव्रतेचे धक्के बसत होते.

या भूकंपाचे धक्के लेबनॉन, इस्रायल आणि सायप्रस या देशांमध्येही जाणवले. ६ फेब्रुवारीला झालेल्या भूकंपामध्ये मृत झालेल्यांची संख्या ४७ सहस्रांहून अधिक झाली आहे.

जगात प्रतिवर्षी होतात २० सहस्र भूकंप  !

राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्र प्रतिवर्षी जभभरातील सुमारे २० सहस्र भूकंपांची नोंद करते. यांपैकी १०० भूकंप असे आहेत की, ज्यामुळे अधिक हानी होते. हे काही सेकंद टिकते. इतिहासातील सर्वाधिक काळ टिकणारा भूकंप वर्ष २००४ मध्ये हिंद महासागरात झाला होता. हा भूकंप १० मिनिटे टिकला.