भाग्यनगर येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे ३ भटक्या कुत्र्यांनी एका ४ वर्षांच्या मुलांवर आक्रमण केले. लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील धावत आले आणि त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली. आक्रमणात गंभीररित्या घायाळ झाल्याने मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या आक्रमणाचे सीसीटीव्ही चित्रण प्रसारित होत आहे. ३ दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशच्या बिलासपूर गावातही भटक्या कुत्र्यांनी कान्हा नावाच्या मुलावर आक्रमण केले होते. यात त्याचा मृत्यू झाला होता.

संपादकीय भूमिका

भटक्या कुत्र्यांची समस्या संपूर्ण देशातील नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. यावर आता केंद्र सरकारने ठोस उपाययोजना काढणे आवश्यक आहे !