‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला ‘सर्वाेत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

मुंबई – दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘आर्.आर्.आर्.’ या चित्रपटाला ‘फिल्म ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला.

मुंबईत हा पुरस्कार सोहळा पार पडला. ‘कांतारा’ चित्रपटातील मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टी यांची ‘सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय अभिनेता’ म्हणून निवड करण्यात आली.