आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटींचे पालन करण्यासाठी पाककडून संसदेत विधेयक संमत

इस्लामाबाद (पाकिस्तान) – दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्‍या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी मान्य करण्यासाठी संसदेत एक विधेयक संमत केले आहे. नाणेनिधीच्या अटींचे पालन केले, तर पाकला सुमारे ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. या अटींमध्ये पाक सैन्याच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात करणे, कर वाढवणे, पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढवणे आदींचा समावेश आहे.