६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांच्या ठिकाणी उत्तरे प्रसिद्ध केली !

इयत्ता बारावीच्या ‘इंग्रजी’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील भोंगळ कारभार !

मुंबई – इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांच्या ठिकाणी उत्तरेच प्रसिद्ध झाली आहेत. यंदा २१ फेब्रुवारीपासून इयत्ता १२ वी ची परीक्षा चालू झाली असून पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता.

इंग्रजीत ८० गुणांची कृतीपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. या वेळच्या प्रश्नपत्रिकेत ३ प्रश्नांची उत्तरे जशीच्या तशी छापून आली आहेत.

बोर्डाने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात सरसकट ६ गुण द्यावेत, अशी मागणी भंडारा येथील इंग्रजी विषयाचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक नदीम खान यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका 

  • अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या होणार्‍या शैक्षणिक हानीला उत्तरदायी कोण ?
  • प्रश्नपत्रिका सिद्ध झाल्यानंतर तिची पुनर्पडताळणी केली जात नाही का ? केली जात असेल, तर ती पडताळणार्‍या संबंधितांना ही त्रुटी लक्षात कशी आली नाही ?