वर्ष २०१९ ते २०२१ या काळात १ लाख १२ सहस्र कामगारांनी केल्या आत्महत्या !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी समाजाला ‘जीवन कसे जगायचे ?’ आणि साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्ट्रात एकही आत्महत्या होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील !

३२ वर्षांनंतर काश्मीरमध्ये खासगी शाळांमध्ये हिंदी शिकवली जाणार !

जम्मू-काश्मीरमध्ये ३२ वर्षांनंतर पहिल्यांदाच इयत्ता १० पर्यंत हिंदी भाषा शिकवण्यात येणार आहे. ‘जम्मू-काश्मीर स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने यासाठी ८ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे.

हिंदुत्वनिष्ठ प्रवीण नेट्टारू हत्येतील आरोपी शाफी बेल्लारे याला जिहादी एस्.डी.पी.आय.कडून तिकीट !

यातून राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा कशा प्रकारे दुरुपयोग करण्याचा प्रयत्न जिहादी संघटनेच्या राजकीय पक्षाकडून केला जात आहे. आता या पक्षावरही बंदी घालण्याची आवश्यकता आहे !

बीबीसीच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण

भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी बीबीसीने कोणतेही अवैध कृत्य केले जात असेल, तर त्याचा शोध घेतलाच पाहिजे ! भारतात राहून भारताची आणि हिंदूंची निंदा करणार्‍या बीबीसीकडून गैरव्यहार होत असेल, तर तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठातील गोळीबारांत ३ जण ठार

‘अमेरिकेसारख्या प्रगत समाजामध्ये गोळीबाराच्या घटना वारंवार का घडतात ?’, याचा विचार समाजशास्त्रज्ञ करतील का ?

(म्हणे) ‘लिथियमचा वापर जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठीच करावा !’ – ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’

अशी धमकी देणार्‍या आतंकवाद्याला शोधून काढून त्याला धडा शिकवल्यास कुणी अशी धमकी देण्याचे दुःसाहस करणार नाही !

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा !

१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कृप्रथा भारतातही चालू आहे. या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकतेच्या गर्तेत ओढली जात आहे.

देवरुख येथील तरुणाची २ लाख रुपयांची ‘ऑनलाईन’ फसवणूक !

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही फसवणूक झाल्याची तक्रार  अलोक प्रमोद नलावडे याने केली आहे.

दापोली (रत्नागिरी) : नगरसेवक चिपळूणकर यांच्याकडून २ ठिकाणांहून केले जात आहे मतदान !

प्रशासनाकडे अशी तक्रार का करावी लागते ? खरे तर निवडणूक आयोगानेच एकच नाव दोन्ही मतदारसंघात असल्याविषयी गुन्हा नोंदवायला हवा होता. लोकप्रतिनिधींनीही स्वत:हून एका मतदारसंघातील नाव काढणे अपेक्षित !

पोलीस ठाण्‍यांतील ‘महिला साहाय्‍य कक्षां’चे सरकार बळकटीकरण करणार !

अत्‍याचार रोखण्‍यासाठी महिलांना स्‍वसंरक्षण प्रशिक्षण आणि समाजात नैतिकचे शिक्षण देणे, हेही तितकेच आवश्‍यक आहे !