दापोली (रत्नागिरी) : नगरसेवक चिपळूणकर यांच्याकडून २ ठिकाणांहून केले जात आहे मतदान !

दापोली नगरपंचायतीच्या नगरसेवकाच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक अजिम चिपळूणकर

रत्नागिरी – जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक अजिम चिपळूणकर यांनी दापोली आणि गिम्हवणे या २ ठिकाणी गेल्या १० वर्षांपासून सातत्याने मतदान केले आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते वसिम मुकादम यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

मौजे गिम्हवणे येथील सहकारनगर येथे चिपळूणकर यांनी न्यूनतम १० वर्षे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केलेले आहे, तसेच चिपळूणकर हे दापोली नगरपंचायतील हद्दीत ‘फॅमिली माळ’ येथेही मतदार आहेत. त्यांनी दापोली नगरपंचायतीची निवडणूकही लढवली असून ते आता नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. या दोन्ही व्यक्ती एकच असल्याचे आधारकार्ड क्रमांकावरून सिद्ध होत आहे. यामुळे भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० चे कलम १८ आणि कलम ३१ अन्वये त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

  • प्रशासनाकडे अशी तक्रार का करावी लागते ? खरे तर निवडणूक आयोगानेच एकच नाव दोन्ही मतदारसंघात असल्याविषयी गुन्हा नोंदवायला हवा होता.
  • लोकप्रतिनिधींनीही स्वत:हून एका मतदारसंघातील नाव काढणे अपेक्षित !