‘व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा !

लांजा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन

लांजा, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कृप्रथा भारतातही चालू आहे. या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकतेच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडे करण्यात आली.

डावीकडून श्री. उदय केळुसकर, डॉ. समीर घोरपडे आणि निवेदन स्वीकारतांना तहसीलदार प्रमोद कदम

समितीच्या वतीने येथील तहसीलदार प्रमोद कदम, गटशिक्षणाधिकारी श्री. विजयकुमार बंडगर, पोलीस निरीक्षक श्री. दादासाहेब घुटुगडे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजाचे उपप्राचार्य श्री. राजेश माळी आणि न्यू इंग्लिश स्कूल व तु.पू. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजाचे उपमुख्याध्यापक श्री. भैरु सोनवलकर यांना निवेदन देण्यात आले.

ही निवेदने देते वेळी सनातन संस्थेचे श्री. उदय केळुसकर, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. समीर घोरपडे, बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री. रुपेश चव्हाण आणि धर्माभिमानी सौ. भारती संसारे उपस्थित होत्या.