पोलीस ठाण्‍यांतील ‘महिला साहाय्‍य कक्षां’चे सरकार बळकटीकरण करणार !

मुंबई, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – पोलीस ठाण्‍यांवर महिला साहाय्‍य केंद्र उभारण्‍याच्‍या केंद्रशासनाच्‍या योजनेवर राज्‍याच्‍या गृहविभागाकडून कार्यवाही चालू आहे. हे काम गतीने व्‍हावे यासाठी राज्‍यशासनाने या योजनेच्‍या समन्‍वयासाठी महिला आणि बाल प्रतिबंध विभागाच्‍या विशेष पोलीस महासंचालकांची नियुक्‍ती केली आहे.

याविषयी १३ फेब्रुवारी या दिवशी सरकारने शासन आदेश काढला आहे. राज्‍यातील पोलीस ठाण्‍यांमध्‍ये महिला साहाय्‍य केंद्र उभारणे आणि त्‍यांना बळकटी देणे, याचे दायित्‍व आता महिला आणि बाल प्रतिबंध विभागाच्‍या विशेष पोलीस महासंचालकांना पहावे लागणार आहे. देहली येथील निर्भया बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणानंतर केंद्रशासनाने महिलांवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी ‘निर्भया निधी’ची व्‍यवस्‍था करण्‍यात येते. यातून महिला साहाय्‍य केंद्रांना अर्थसाहाय्‍य केले जाणार आहे.

संपादकीय भूमिका 

अत्‍याचार रोखण्‍यासाठी महिलांना स्‍वसंरक्षण प्रशिक्षण आणि समाजात नैतिकचे शिक्षण देणे, हेही तितकेच आवश्‍यक आहे !