(म्हणे) ‘लिथियमचा वापर जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठीच करावा !’ – ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’

 लिथियमच्या साठ्यावरून जिहादी आतंकवादी संघटनेची धमकी !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या रियासी येथे ‘लिथियम’ (नॉन-फेरस मेटल – अलोह धातू) या धातूचा ५९ लाख टन साठा सापडल्यानंतर जैश समर्थित दहशतवादी संघटना ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या जिहादी आतंकवादी संघटनेने एक पत्र लिहून धमकी दिली आहे. यात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेल्या साधन संपत्तीची चोरी होऊ देणार नाही. ही साधन संपत्ती जम्मू-काश्मीरमधील लोकांची आहे, त्यांचा वापर स्थानिक लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्हायला हवा.

या ठिकाणी लिथियमसमवेत सोन्याचे ५ साठेही सापडले आहेत. लिथियमचा वापर भ्रमणभाष, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहन आणि इतर उपकरणांच्या चार्ज करण्यायोग्य बॅटरी निर्मितीसाठी केला जातो. हा एक दुर्मिळ धातू आहे.

संपादकीय भूमिका 

अशी धमकी देणार्‍या आतंकवाद्याला शोधून काढून त्याला धडा शिकवल्यास कुणी अशी धमकी देण्याचे दुःसाहस करणार नाही !