सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवेसह राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी आगामी अधिवेशनात आवाज उठवणार !

अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, आरोग्यसेवा, धर्मांतर यांसह राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रश्न मांडून आवाज उठवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नूतनीकरण केलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा ११ फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा ! – सुभाष फळदेसाई, पुरातत्वमंत्री

गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असलेल्या मंदिराच्या जीर्णाेद्वाराचे काम करतांना मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आणि पावित्र्य जपून ठेवण्यात आले आहे.

१० फेब्रुवारीला मुंबईत होणार ‘वंदे भारत’ ट्रेनचे उद्घाटन !

पंतप्रधानांच्या मुंबई दौर्‍याच्या वेळी ड्रोन, पतंग आदी उडवण्यावर बंदी ! ९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून १० फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्देश लागू असणार आहेत.

फेब्रुवारी मासाच्या शेवटी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याचे काम चालू होईल ! – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या आत विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या सूत्राच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिष्टमंडळास ही माहिती दिली.

‘मॉकड्रिल’ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सरकारचे म्हणणे मागवले !

आतंकवादी आक्रमणाचे ‘मॉकड्रिल’ चालू असतांना आतंकवाद्यांची भूमिका बजावणार्‍या पोलिसांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्याची घटना चंद्रपूर आणि नगर जिल्ह्यांत घडली होती.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्या ! – प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद  

‘जर पाकिस्तान ऐकत नसेल, तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी भारतातून पाकिस्तानात जाणार्‍या नदीचे पाणी अडवावे अन् तरीही ते ऐकत नसतील, तर पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे सोडावीत.’’

बिहारमध्ये पी.एफ्.आय.च्या आणखी २ जिहादी कार्यकर्त्यांना अटक !

पी.एफ्.आय.वर बंदी घातल्यानंतर संघटनेने सशस्त्र प्रशिक्षण देणे बंद केले असून जिहादी कारवाया करण्याच्या पद्धतीत पालट केला आहे. जिहादी कार्यकर्ते भूमीगत राहून काही लोकांना लक्ष्य करण्याचा कट रचत आहेत.

बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदाचे त्यागपत्र !

‘बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला असे त्यागपत्र द्यावे लागणे, हे दुर्दैवी आहे. जर काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येऊ पहात असतील, तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत.

भाजपच्या महिला नेत्या असणार्‍या अधिवक्त्या लक्ष्मण चंद्रा व्हिक्टोरिया गौरी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती

सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले, ‘यापूर्वीही राजकीय पार्श्वभूमी असणार्‍या व्यक्तींची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.’ केवळ २२ मिनिटांपर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे ! – योगी आदित्यनाथ

ज्या काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे आणि ती येथे साम्यवाद्यांच्या समवेत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.