तुर्कीयेने रहित केला पाकच्या पंतप्रधानांचा दौरा !
काश्मीरच्या सूत्रावर पाकला साहाय्य करणार्या तुर्कीयेने पाकला त्याची लायकी दाखवली, हेच यातून स्पष्ट होते !
काश्मीरच्या सूत्रावर पाकला साहाय्य करणार्या तुर्कीयेने पाकला त्याची लायकी दाखवली, हेच यातून स्पष्ट होते !
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅन जोस उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. हा पुतळा चक्क कापून चोरी करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ फेब्रुवारी या दिवशी संसदेत फिकट निळ्या रंगाचे जॅकेट परिधान करून आले होते. हे जॅकेट कापडाचे नसून पुनर्वापर करण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटलीपासून बनवण्यात आले आहे.
श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी भगवान केशव महाराज यांची मूर्ती न्यायालयात आणण्यात आली. या प्रकरणात २३ जानेवारी या दिवशी सुनावणी झाली होती. त्या वेळी न्यायालयाने या प्रकरणातील ६ क्रमांकाचे वादी भगवान केशव महाराज हे अनुपस्थित नसल्याचे म्हटले होते.
अमेरिकेतील आस्थापन ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालात भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आर्थिक अपव्यवहाराचा आरोप करण्यात आल्यानंतर अदानी यांच्या उद्योग समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शहरातील आर्.व्ही. विश्वविद्यालयाने कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (आर्टीफिशल इंटेलिजन्टद्वारे) चालवण्यात येणारी संभाषणात्मक संगणकीय प्रणाली ‘चॅटजीपीटी’वर बंदी घातली आहे, तर शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी राज्याची राजधानी लखनौचे नामांतर करण्याविषयी विधान केले आहे. येथे पत्रकारांशी बोलतांना पाठक म्हणाले की, लखनौविषयी सर्वांना ठाऊक आहे की, ते लक्ष्मणाचे शहर आहे. त्यामुळे सरकार लवकरच या शहराचे नामांतर करणार आहे.
तुर्कीये आणि सीरिया देशांतील भूकंपामध्ये आतापर्यंत ८ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून पडलेल्या इमारतींच्या ढिगार्याखाली सहस्रो लोक अडकल्याची शक्यता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होत रहाणार असल्याचे सांगितले जात आहे.
चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशदाराचा हुक तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील सुट्या पैशांची अर्पणपेटी फिरवून ठेवली, तर दुसरी नोटा असलेली अर्पणपेटी फोडून आतील रोख रक्कम पळवली आहे.
पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी गोवा शासनाने २० कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय प्रावधान केले आहे. यासाठी सरकारकडे आतापर्यंत १९ अर्ज आलेले आहेत- पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई