ब्राह्मणांनी मुख्यमंत्री होऊ नये का ? ते या देशाचे नागरिक नाहीत का ?

विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी पुढे म्हणाले की, ब्राह्मणांच्या विरोधात बोलणे यात नवीन काहीच नाही. पूर्वीपासून ब्राह्मणांविरुद्ध बोलले जात असलेले ऐकिवात आहेच. निवडणूक आली की, याचे प्रमाण वाढते, एवढेच !

रत्नागिरी : लाल आणि निळ्या पूररेषेवर ८ दिवसांत बैठक घेऊन ठोस निर्णय घेऊ ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या रेषांमुळे चिपळूणचा मोठा नागरी वस्तीचा भाग बाधित झाल्याने या रेषा रहित करण्याची मागणी केली जात आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखून प्रतिबंधक उपाय योजावेत !

‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. 

रत्नागिरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघातानंतर मृत्यू

सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो. हा योगायोग असू शकत नाही. हा ठरवून घडवून आणलेला घातपात आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार ! – पालकमंत्री उदय सामंत

या बोर्डाच्या माध्यमातून समस्या सोडवण्यासाठी समिती नेमून या समितीवर २ बागायतदार प्रतिनिधी नेमण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला.

धारावी येथील पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर यांची पदावरून उचलबांगडी !

कर्तव्‍यचुकार पोलिसांची पदावरून उचलबांगडी करणे पुरेसे नसून त्‍यांना बडतर्फ करून कारागृहात डांबणे आवश्‍यक !

सातारा येथे आंबेघर-भोगवली सोसायटीमध्‍ये ८४ लाख ३९ सहस्र रुपयांचा घोटाळा !

जावळी तालुक्‍यातील आंबेघर-भोगवली येथील ‘विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्‍थे’त ८४ लाख ३९ सहस्र २७९ रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. या प्रकरणी सोसायटीचे सचिव अजित तुकाराम रांजणे यांच्‍यावर मेढा पोलीस ठाण्‍यात फसवणुकीचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्‍यावर मारहाणीचा गुन्‍हा नोंद

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्‍यावर पत्नीला मारहाण केल्‍याचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. कांबळी यांची पत्नी अँड्रिया यांनी या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली होती.

असे लोकप्रतिनिधी देशाचे काय भले करणार ?

‘संस्कृतमध्ये ‘समानशीले व्यसनेषु सख्यम् ।’, म्हणजे, ‘समान गुणदोष असतांना, तसेच संकटाच्या वेळी एकमेकांची मैत्री होते’ असे एक सुभाषित आहे. या सिद्धांतानुसार जनता रज-तमप्रधान असल्याने निवडणुकीत निवडून येणारे जनतेचे प्रतिनिधी तसेच असतात ! ते देशाचे काय भले करणार ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले