पंतप्रधानांच्या मुंबई दौर्याच्या वेळी ड्रोन, पतंग आदी उडवण्यावर बंदी !
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘वंदे भारत’ ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. त्यांच्या दौर्यानिमित्त सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आली असून मुंबई पोलिसांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या दौर्याच्या वेळी उडत्या गोष्टींवर (फ्लाइंग ऑब्जेक्ट्स) वर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये ड्रोन, पॅराग्लायडर्स, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट यांचा समावेश आहे.
मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन#VandeBharat #Mumbai #shirdi https://t.co/hygFweDLgK
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 5, 2023
विमानतळ, तसेच सहार, कुलाबा, एम्.आय.डी.सी. आणि अंधेरी या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून १० फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्देश लागू असणार आहेत.