रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरातील आरतीच्‍या वेळी साधिकेला आलेल्‍या अनुभूती

श्रीरामाची आरती चालू झाल्‍यावर माझा भाव जागृत झाला. नंतर हनुमान, श्री दुर्गादेवी आणि श्रीकृष्‍ण यांची आरती म्‍हणतांना ‘त्‍या आरत्‍या कधी म्‍हणून झाल्‍या’, हे मला समजलेही नाही. ‘प्रत्‍येक आरती अल्‍प वेळेत म्‍हणून होत आहे’, असे मला वाटत होते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात ‘पंचकर्म आणि बिंदूदाबन’ संदर्भातील सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात ‘पंचकर्म आणि बिंदूदाबन’ संदर्भातील सेवा करणार्‍या साधकांना आश्रमातील संत आणि साधक यांच्‍यावर ‘पंचकर्म आणि बिंदूदाबन’ उपचार करण्‍याची संधी मिळते.

परात्‍पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्‍याविषयी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना आलेली अनुभूती आणि मनाची झालेली विचारप्रक्रिया !

नामजपादी उपाय करतांना मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची पुष्‍कळ आठवण आली. माझ्‍या देहात त्‍यांना सूक्ष्मातून अनुभवत असतांना ‘तेे एक ‘ईश्‍वरी तत्त्व’ आहे आणि माझ्‍यातील अंतरात्‍म्‍याचे तत्त्व त्‍यांच्‍यातील ईश्‍वरी तत्त्वाशी एकरूप होत आहे’, असे माझ्‍या अंतर्मनाला अनुभवता येत होते.

आज विटा (जिल्‍हा सांगली) येथे भव्‍य ‘हिंदु गर्जना मोर्चा’ !

खानापूर तालुक्‍यातील सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २४ जानेवारीला सकाळी १० वाजता भव्‍य ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्‍यात आले आहे. ‘लव्‍ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्‍या यांच्‍या विरोधात कठोर कायदे व्‍हावेत, मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावेत, या प्रमुख मागण्‍यांसाठी हा मोर्चा काढण्‍यात येणार आहे.

अनिल देशमुख यांच्‍या जामिनाच्‍या स्‍थगितीची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली !

महाराष्‍ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍या जामिनाला स्‍थगिती द्यावी, यासाठी केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेने केलेली याचिका २३ जानेवारी या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली. देशमुख यांना मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या जामिनाला स्‍थगिती मिळावी, यासाठी केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका केली होती.

हिंदु संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी देवस्‍थानाचा विकास आवश्‍यक ! – सुरेश चव्‍हाणके, ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनी

प्रत्‍येक देवस्‍थान हे हिंदु संस्‍कृतीचे प्रेरणास्‍थान असल्‍यामुळे त्‍यांचा विकास झाला पाहिजे. हिंदु संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी त्‍याची आवश्‍यकता आहे. देवस्‍थानांच्‍या माध्‍यमातून धार्मिकता वाढीस साहाय्‍य होते. नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाच्‍या दर्शनाने समाधान लाभले.

अयोध्‍या येथील श्रीराम मंदिराचा गाभारा ७०० कोटींचा !

संपूर्ण देशाचे लक्ष असलेले अयोध्‍या येथील श्रीराम मंदिर जानेवारी २०२४ च्‍या शेवटच्‍या आठवड्यात भाविकांसाठी खुले होणार आहे. आतापर्यंत मंदिराच्‍या गर्भगृह निर्मितीवर ७०० कोटी रुपयांहून अधिक व्‍यय झाला आहे; पण गर्भगृह आणि सुरक्षा भिंत या पहिल्‍या टप्‍प्‍यावर १ सहस्र ५०० कोटी रुपयांपर्यंत व्‍यय येणार आहे…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपत्तीचे जी.आय.एस्. सर्वेक्षण करून महसूल गळती रोखणार ! – मुख्यमंत्री

गोवा शासनाने अशा सविस्तर सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. या सर्वेक्षणामुळे कर व्यवस्थितपणे गोळा करता येणार आहे, तसेच अवैध बांधकामे शोधून काढता येणार आहेत.

सर्वेक्षणातील चुकीमुळे धनगरवाडी, आरोस येथील ५ कुटुंबे पाण्यापासून वंचित रहाण्याची शक्यता

धनगरवाडी अतीदुर्गम भागात आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. नळपाणीपुरवठा योजनेसाठी सर्वेक्षण करतांना येथील २५ पैकी ५ कुटुंबांना वगळण्यात आले आहे.

परीक्षा हा सण असावा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसतांना काळजी करू नये, तर तो एक सण म्हणून साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.