हिंदु संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी देवस्‍थानाचा विकास आवश्‍यक ! – सुरेश चव्‍हाणके, ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनी

श्री. सुरेश चव्हाणके

नगर – प्रत्‍येक देवस्‍थान हे हिंदु संस्‍कृतीचे प्रेरणास्‍थान असल्‍यामुळे त्‍यांचा विकास झाला पाहिजे. हिंदु संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी त्‍याची आवश्‍यकता आहे. देवस्‍थानांच्‍या माध्‍यमातून धार्मिकता वाढीस साहाय्‍य होते. नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाच्‍या दर्शनाने समाधान लाभले. मंदिराचा झालेला विकास नेत्रदीपक असून प्रत्‍येक देवस्‍थानाच्‍या सर्वांगीण विकासासाठी भाविकांनी योगदान देणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनीचे मुख्‍य संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी केले. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे चव्‍हाणके यांनी भेट दिली असता त्‍यांच्‍या हस्‍ते आरती करण्‍यात आली. या वेळी सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट, देवस्‍थानचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता अभय आगरकर आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. अधिवक्‍ता आगरकर यांनी देवस्‍थानच्‍या वतीने चालू असलेल्‍या उपक्रमांची माहिती दिली.