बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथे हिंदु जनजागृती समितीद्वारे ८.१.२०२३ या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे सूक्ष्म-परीक्षण !

बालकक्षामध्ये बालसाधकांनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा पेहराव केला होता. त्यांना पाहिल्यामुळे हिंदूंना भारतातील क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचे स्मरण होऊन त्यांचे उदाहरण मनावर बिंबले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे त्रिकालदर्शीत्व !

एकदा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘पुढे सनातनचे ग्रंथच प्रसाराचे कार्य करणार आहेत.’’ ते आता सत्य होत आहे. सर्वत्रच्या ग्रंथ अभियानामुळे होत असलेले प्रचंड मोठे कार्य पाहिल्यास गुरुदेवांचे त्रिकालदर्शीत्व लक्षात येते.’

गुरुकृपायोगानुसारच्या साधनेत भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्या काही तत्त्वांचा समावेश असल्याने साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणे

गुरुकृपायोगानुसार एकूण १२२ साधक संत झाले, तर १ सहस्र ८७ साधकांचा प्रवास त्या दिशेने चालू आहे. साधकांची शीघ्र उन्नती होण्याचे कारण हे की, गुरुकृपायोगामध्ये भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग या तीन प्रमुख साधनामार्गांतील काही साधनांचा समावेश आहे.

साधकांनो, ‘आध्यात्मिक उन्नती कधी होईल ?’, याची काळजी न करता परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून तळमळीने प्रयत्न करत रहा !

परात्पर गुरु डॉक्टरांनी तिच्याविषयी काढलेल्या उद्गारानंतर जवळजवळ १६ वर्षांनी तिच्यात साधनेविषयी अंतर्मुखता येऊ लागली असून तिची आध्यात्मिक उन्नती होत आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी घालण्याविषयी प्रशासन उदासीन का ? – कुंभार समाज संघटना

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने २५ ऑगस्ट २०२१ या दिवशी दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, ‘पीओपी’पासून बनवलेली काेणतीही मूर्ती पूजेसाठी विकता येणार नाही. अशा मूर्ती सार्वजनिक किंवा घरगुती तलावात विसर्जित करता येणार नाहीत.

मालाड (मुंबई) येथील ‘टिपू सुलतान’ उद्यानाचे नाव पालटण्याचा जिल्हाधिकार्‍यांना आदेश !

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री असतांना मालाड येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ याच्या नावाची कमान लावण्यात आली होती.

नवीन संसद भवनात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावावे !

छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी !

उच्च शिक्षणही मातृभाषेतून मिळणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण हे मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ‘बालभारती’ हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला, तरी पुढील काळासाठी चित्रफीतीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे उद्घाटन महाराष्ट्रातील साधू, संत आणि महंत यांच्या हस्ते करणार ! – नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री

फलटण (जिल्हा सातारा) येथे विविध रस्तेकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, तसेच जिल्ह्यातील आमदार अन् विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

आमदार संतोष बांगर यांच्यासह ३० जणांवर गुन्हे नोंद !

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण केल्याचे प्रकरण