आमदार संतोष बांगर यांच्यासह ३० जणांवर गुन्हे नोंद !

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण केल्याचे प्रकरण

हिंगोली – येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे कळवणू येथील आमदार संतोष बांगर यांच्यासह त्यांच्या ३०-४० कार्यकर्त्यांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचसमवेत महाविद्यालयातील ५ अधिकार्‍यांवरही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आमदार बांगर यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड केल्यामुळे ५ सहस्र रुपयांची हानी झाली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

याविषयी आमदार बांगर म्हणाले की, प्राचार्य अशोक उपाध्याय यांनी एका महिलेवर अन्याय केला होता. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हे मी सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा नोंद झाला, तरी त्याची पर्वा नाही.