नवीन संसद भवनात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावावे !

छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी !

मुंबई – विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. नवीन संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनाप्रमुख, प्रसिद्ध संपादक, व्यंगचित्रकार, लेखक, सामना वृत्तपत्राचे संस्थापक, प्रखर हिंदुत्वनिष्ठ बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावावे. यासाठी केंद्रशासनाकडे मागणी करून पाठपुरावा घ्यावा, अशी विनंती पत्रात केली आहे. ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. तैलचित्र लावल्यामुळे लोकप्रतिनिधींना प्रेरणा आणि स्फूर्ती मिळेल’, असे म्हटले आहे.