गुरुकृपायोगानुसारच्या साधनेत भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्या काही तत्त्वांचा समावेश असल्याने साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘गुरुकृपायोगानुसारच्या साधनेत ‘स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, भक्तीभाव, सत्साठी त्याग आणि इतरांविषयी प्रीती (निरपेक्ष प्रेम)’ या अष्टांग साधनेनुसार साधना करतांना साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होते. गुरुकृपायोगानुसार एकूण १२२ साधक संत झाले, तर १ सहस्र ८७ साधकांचा प्रवास त्या दिशेने चालू आहे. साधकांची शीघ्र उन्नती होण्याचे कारण हे की, गुरुकृपायोगामध्ये भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग या तीन प्रमुख साधनामार्गांतील काही साधनांचा समावेश आहे. याचे विवरण पुढे दिले आहे.

१ . वरील सारणीतील काही अंगांचे विश्लेषण

१ अ. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, तसेच अहं-निर्मूलन : ज्ञानयोगात प्रामुख्याने ‘मी’ला विसरायचे असते. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न  केल्यामुळे ‘मी’ला विसरण्याची साधना होते. गुणांचे संवर्धन करतांनाही आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे आपोआप निर्मूलन होत असते, उदा. ‘प्रेमळपणा’ हा गुण अंगी बाणवतांना आपल्यातील ‘राग’ आपोआप अल्प होऊ लागतो. यासाठीच हा ज्ञानयोग आहे.

१ आ. सत्संग : यामुळे अध्यात्मातील ज्ञान मिळते, तसेच ‘मला इतरांकडून शिकायचे आहे’, ही जाणीव असल्याने ‘मी’पणा नष्ट होण्यास साहाय्य होते; म्हणून हा ज्ञानयोग आहे.

१ इ. सत्साठी त्याग : यात समर्पणाची वृत्ती असल्याने ‘मी’ला विसरणे होते; म्हणून हा ज्ञानयोग आहे.

१ ई. सत्सेवा : ‘सत्सेवा ही गुरूंची सेवा किंवा धर्मसेवा आहे आणि गुरु किंवा देव ती माझ्याकडून करवून घेत आहे’, हा भाव असल्याने सत्सेवेचे कर्म हे ‘निष्काम कर्म’ होते; म्हणून हा कर्मयोग आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.४.२०२२)