अभिनेत्री उर्फी जावेद हिला मुंबईत भाड्याने घर देण्‍यास सर्वांचाच नकार !

तिने सांगितले, ‘‘माझ्‍या कपड्यांमुळे मुसलमान मालक मला घर भाड्याने देत नाहीत आणि मी मुसलमान आहे; म्‍हणून हिंदु मालक घर भाड्याने देत नाहीत. मला मिळणार्‍या राजकीय धमक्‍यांची काही मालकांना भीती वाटते. त्‍यामुळे मुंबईत भाड्याने जागा शोधणे अवघड आहे.’’

श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपाचे लाकडी खांब कुजले !

गरुड मंडपातील खराब झालेले खांब पालटण्‍यात येणार आहेत, तसेच नगारखान्‍यातील लाकूडकामही खराब झाले आहे. याच्‍या दुरुस्‍तीसाठी ‘कोल्‍हापूर हेरिटेज समिती’ने अनुमती दिली असून राज्‍य पुरातत्‍व विभागाची अनुमतीही मिळेल, असे देवस्‍थान समितीच्‍या वतीने सांगण्‍यात आले.

इयत्ता पाचवी आणि आठवी यांच्‍या शिष्‍यवृत्ती परीक्षेत दीड लाखांहून अधिक विद्यार्थी

राज्‍य परीक्षा परिषदेच्‍या घेण्‍यात येणार्‍या इयत्ता पाचवी आणि आठवी यांच्‍या शिष्‍यवृत्ती परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्‍यांची नोंदणी वाढली आहे. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत दोन्‍ही इयत्तांचे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी वाढले आहेत. १२ फेब्रुवारीला ही परीक्षा होणार आहे.

नगरपालिका इमारतीसाठी उत्‍खनन केलेल्‍या गौण खनिजाची परस्‍पर विक्री !

शासकीय महसूल बुडवून शासनाची फसवणूक करणार्‍यांवर शासनानेच कठोर कारवाई करावी !

नव्‍या रथातून होणार करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची नगर प्रदक्षिणा !

आता रथ संपूर्ण सागवानी लाकडात सिद्ध केला असून पुढील २०० वर्षे सुरक्षित राहील, असा दावा देवस्‍थान समितीने केला आहे.

सोलापूर विद्यापिठाच्‍या उत्तरपत्रिकांची ‘ऑनस्‍क्रीन’ पडताळणी होणार !

यंदाच्‍या वर्षी उत्तरपत्रिकांची ‘ऑनस्‍क्रीन’ पडताळणी झाल्‍यास मागील वर्षीचा सांवळा गोंधळ रोखला जाईल, अशी इच्‍छा व्‍यक्‍त केली जात आहे.

सातारा जिल्‍ह्यात विजेची चोरी करणार्‍या ग्राहकांकडून दीड कोटी रुपयांचा दंड वसूल !

एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची चोरी होत असतांना प्रशासन काय करत होते ? विजेची चोरी होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना काढणे आवश्‍यक !

‘मराठी’ लोप पावलेली साहित्‍य संमेलने !

ज्‍या संमेलनांमध्‍ये श्री सरस्‍वतीदेवीलाच नाकारले जात असेल, तेथे मराठीच्‍या उत्‍कर्षाची अपेक्षा काय ठेवणार ? तसे मंथन या संमेलनातून घडण्‍यासाठी सारस्‍वतांना श्री गणेश आणि श्री सरस्‍वतीदेवी सद़्‍बुद्धी देवो, हीच प्रार्थना !

पाद्य्रांचे खरे स्‍वरूप जाणा !

ख्रिस्‍त्‍यांचे माजी सर्वोच्‍च धर्मगुरु पोप बेनेडिक्‍ट १६ वे यांच्‍या निधनानंतर त्‍यांचे ‘ख्रिस्‍ती धर्म काय आहे ?’, हे पुस्‍तक प्रकाशित झाले आहे. यात त्‍यांनी पाद्री बनण्‍याचे प्रशिक्षण देणार्‍या शिबिरामध्‍ये समलैंगिक क्‍लब चालण्‍यात येत असल्‍याचा दावा केला आहे.

…तिला आपण अंधश्रद्धा असे म्‍हणू शकत नाही !

आपण मराठीचे अभिमानी असूनही चुकीचे मराठी शब्‍दप्रयोग अनेक वेळा करत असतो, हेसुद्धा या ‘सो कॉल्‍ड’ (तथाकथित) बुद्धीवादी लोकांच्‍या लक्षात येत नाही. श्रद्धा या शब्‍दातच आंधळेपणा हा अनुस्‍यूत (अध्‍यारूढ) आहे. श्रद्धेची पहिली अट आंधळेपणा हीच असते.