कोल्हापूर – श्री महालक्ष्मी मंदिरातील सध्याचा रथ खराब झाल्याने नवीन रथाची निर्मिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून करण्यात येत आहे. गेल्या दीड मासापासून हा रथ बनवण्याचे काम चालू असून या रथासाठी कर्नाटकातील भाविकाने १२ लाख रुपयांचे सागवानी लाकूड अर्पण केले आहे. यंदा चैत्र यात्रेनंतर ६ एप्रिलला होणारा देवीचा रथोत्सव हा नव्या रथातून साजरा केला जाणार आहे.
यापूर्वीचा रथ दोन वेळा खराब झाला होता. प्लास्टिक, फायबर, प्लायवूड, लोखंडी पट्टी यांचा वापर करून रथाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता रथ संपूर्ण सागवानी लाकडात सिद्ध केला असून पुढील २०० वर्षे सुरक्षित राहील, असा दावा देवस्थान समितीने केला आहे.