पुणे – राज्य परीक्षा परिषदेच्या घेण्यात येणार्या इयत्ता पाचवी आणि आठवी यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही इयत्तांचे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी वाढले आहेत. १२ फेब्रुवारीला ही परीक्षा होणार आहे.
वर्ष २०२१ मध्ये पाचवीच्या ३ लाख ८८ सहस्र ५१२ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या २ लाख ४४ सहस्र ३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. वर्ष २०२२ मध्या पाचवीच्या ४ लाख १८ सहस्र ५३, तर आठवीच्या ३ लाख ३ सहस्र ८१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा पाचवीच्या ५ लाख ३२ सहस्र ४९३ आणि आठवीच्या ३ लाख ६७ सहस्र ४२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली.
विद्यार्थीसंख्येत वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह बैठका घेण्यात आल्या. या परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा पाया निर्माण केला जात आहे. पालक आणि शिक्षक यांच्यात त्याविषयीची जागृती झाल्याने विद्यार्थी संख्या वाढलेली आहे’, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी सांगितले.