श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपाचे लाकडी खांब कुजले !

श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपाचे लाकडी खांब कुजले

कोल्‍हापूर – साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपातील खांब भूमीखाली कुजले आहेत. खांबाचे आणि नगारखान्‍याचे काम राज्‍य पुरातत्‍व विभागाच्‍या देखरेखीखाली केले जाईल, असे जिल्‍हाधिकारी तथा देवस्‍थान समितीचे प्रशासक राहुल रेखावार यांनी सांगितले. गरुड मंडप, तसेच नगारखान्‍यात करण्‍यात येणार्‍या दुरुस्‍तीची जिल्‍हाधिकार्‍यांनी २ घंटे पहाणी केली.

(सौजन्य : News State Maharashtra Goa)

गरुड मंडपातील खराब झालेले खांब पालटण्‍यात येणार आहेत, तसेच नगारखान्‍यातील लाकूडकामही खराब झाले आहे. याच्‍या दुरुस्‍तीसाठी ‘कोल्‍हापूर हेरिटेज समिती’ने अनुमती दिली असून राज्‍य पुरातत्‍व विभागाची अनुमतीही मिळेल, असे देवस्‍थान समितीच्‍या वतीने सांगण्‍यात आले. फेब्रुवारी आणि मार्च मध्‍ये मंदिरात तुलनेने गर्दी अल्‍प असते. त्‍यामुळे या २ मासांत हे काम अधिकाधिक पूर्ण करण्‍याचे नियोजन आहे.