नगरपालिका इमारतीसाठी उत्‍खनन केलेल्‍या गौण खनिजाची परस्‍पर विक्री !

सामाजिक कार्यकर्त्‍याचा आरोप

सातारा नगरपालिका इमारतीसाठी उत्‍खनन केलेल्‍या गौण खनिजाची परस्‍पर विक्री

 

सातारा, २६ जानेवारी (वार्ता.) – येथील सदरबझार परिसरात ‘टी अँड टी’ आस्‍थापनाच्‍या माध्‍यमातून सातारा नगरपालिकेच्‍या नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. या कामासाठी उपयोगात आणल्‍या जाणार्‍या गौण खनिजाचे उत्‍खनन करून ते परस्‍पर विक्री केले असल्‍याचा आरोप एका सामाजिक कार्यकर्त्‍याने केला आहे. याविषयी जिल्‍हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्‍याकडे लेखी पत्रही देण्‍यात आले आहे.

जिल्‍हाधिकार्‍यांना दिलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, ‘टी अँड टी’ आस्‍थापनाकडून नगरपालिका इमारतीसाठी केलेले उत्‍खनन परस्‍पर एका ठेकेदाराला विकण्‍यात आले. यातून मोठ्या प्रमाणात शासकीय महसूल बुडवण्‍यात आला आहे. याची नोंद सातारा नगरपालिकेने घेणे आवश्‍यक होते; मात्र तसे झाले नाही. आस्‍थापन स्‍वत: नगरपालिकेची मालक असल्‍याप्रमाणे वागत आहे. आम्‍ही काहीही केले, तरी आम्‍हाला कुणी विचारत नाही, कुणी दंड करत नाही, अशा भावनेने काम करत आहे. दुर्दैवाने एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला काळा व्‍यवहार कुणाच्‍याही लक्षात आला नाही.

संपादकीय भूमिका

शासकीय महसूल बुडवून शासनाची फसवणूक करणार्‍यांवर शासनानेच कठोर कारवाई करावी !