मराठी विश्व संमेलनात विदेश आणि परराज्य येथील मराठीप्रेमींना एका व्यासपिठावर आणणार ! – दीपक केसरकर, मराठी भाषामंत्री
ते म्हणाले, ‘‘६५ वर्षांत असा कार्यक्रम कुणी केला नाही. यावर्षी मर्यादित आर्थिक निधीमध्ये संमेलन करत आहेत. पुढील वेळी अधिक निधी देण्यात येईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्राप्त झालेले नवीन पुरावे आम्ही केंद्रशासनाकडे सादर करू.