यवतमाळ, २ जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांमध्ये ‘हिरकणी’ कक्ष नावापुरताच आहे. जिल्हा मुख्यालयातील ‘हिरकणी’ कक्ष कुलूपबंद आहे. उमरखेड आणि आर्णी येथे ‘हिरकणी’ कक्षच नाही, तसेच अन्य ठिकाणी असूनही तो नसल्यासारखा आहे. विभाग नियंत्रकाच्या म्हणण्यानुसार सर्वच ९ आगारांत हिरकणी कक्ष आहे; पण त्याची कडी लावलेली असते. मागणी केल्यास उघडून दिला जातो. अशा अडचणींमुळे स्तनदा मातांना बाळाला दूध पाजण्यासाठी आडोसा शोधावा लागतो. (प्रशासनाकडून सर्व सुविधा देण्याचा आव आणला जातो; मात्र प्रत्यक्षात स्थिती निराळीच असते. प्रशासकीय यंत्रणेत शिक्षापद्धत आवश्यक आहे. – संपादक)