प्रेमास विरोध करणार्‍या वडिलांची मुलगा सोहेल बागवान याच्याकडून हत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कासेगाव येथील सोहेल बागवान याने स्वत:चे वडील अफझल बागवान यांची जाळून हत्या केली. हे प्रकरण एका प्रेमप्रकरणातून घडले आहे. या प्रकरणी मृत अफझल बागवान यांचा मुलगा सोहेल यासह ३ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

३ अल्पवयीन मुलांच्या आईचे अफझल बागवान यांच्याशी प्रेमसंबंध होते, तर ३ अल्पवयीन मुलांमधील एका मुलीचे अफझल बागवान यांचा मुलगा सोहेल याच्याशी प्रेमसंबंध होते; मात्र अफझलला सोहेल आणि संबंधित अल्पवयीन मुलगी यांचे प्रेमसंबंध असणे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी अफझल बागवान यांची हत्या केली.

संपादकीय भूमिका

हे आहेत धर्मांधांच्या मुलांवरील संस्कार !