‘वेदांता फॉक्सकॉन’ प्रकल्पाविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिशाभूल ! – आमदार आदित्य ठाकरे

१९ जानेवारी २०२२ या दिवशी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वेदांता फॉक्सकॉनला पत्र पाठवून महाराष्ट्रात आवश्यक ते सर्व साहाय्य करण्यात येईल, असे सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील सर्व आमदार आणि खासदार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देणार !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अभिनेता सलमान खान यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. अंबानी कुटुंबियांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे.

अमरावती येथील धोकादायक इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू !

मृतकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ५ लाख रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन !

महाराष्ट्रातील प्रकल्प अन्य राज्यांत जात असल्याचे प्रकरण !

१३४ लोकांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ?

‘मोठ्या अपघातांमागील उत्तरदायींना शिक्षा होते’, असे कुणीही ठामपणे म्हणू शकत नाही. भारतियांची संवेदनशीलता काही घंटे किंवा काही दिवसांचीच असते. या घटनेविषयीही वेगळे काही होईल, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल !

सोलापूर येथील भद्रावती पेठ ते बोरामणी नाका रस्त्याची दुरवस्था !

शहरातील अनेक प्रमुख रस्ते मागील काही मासांपासून नादुरुस्त झालेले आहेत. जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना दैनंदिन वाहतुकीसाठी कसरत करावी लागत आहे. भद्रावती पेठ ते बोरामणी नाका हा प्रमुख रस्ता सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी वापरला जातो

पुणे शहरात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने दात्यांना रक्तदान करण्याचे रक्तपेढ्यांचे आवाहन

सध्या शहरामध्ये डेंग्यूचा फैलाव होत आहे. त्यामुळे त्या रुग्णांवरील उपचारांसाठी आवश्यक ‘प्लेटलेट’ आणि इतर रक्तघटकांना असलेली मागणी वाढली आहे; परंतु शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या उपलब्ध असलेला रक्ताचा साठा पुरेसा नसल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे.

यवतमाळ बसस्थानकात सांडपाणी आणि घाणीचे साम्राज्य यांमुळे दुर्गंधी !

प्रवाशांची हेळसांड करणार्‍या अशा कर्तव्यशून्य अधिकार्‍यांना प्रवशांनीच आता जाब विचारला पाहिजे !

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग ३)’ या ग्रंथाचे प्रकाशन

भजनांचा सुगम अर्थबोध करून देऊन भजनानंदी डुंबवणारा ग्रंथ !