शिवनेरी (पुणे) गडाच्या पायथ्याशी वाहनतळासाठी जागा द्यावी ! – श्री शिवाई मंदिर देवस्थान ट्रस्ट

शिवनेरी गडावर पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वाहनतळाची समस्या गंभीर होत आहे. गडाच्या पायथ्याशी असणार्‍या दत्तनगर येथील पुनर्वसित गावठाणाची जागा वाहनतळासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ‘श्री शिवाई मंदिर देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

इतर राज्यांत स्थलांतरित होणार्‍या उद्योगांविषयी श्वेतपत्रिका काढली पाहिजे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रनसह अन्य प्रकल्पांविषयी नेमके काय झाले, ही वस्तूस्थिती सांगणारी श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३१ ऑक्टोबर येथे पत्रकारांशी बोलतांना केली.

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा वेतनकपातीचा आदेश झुगारला !

जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील ‘बायोमेट्रिक’ यंत्र बंद असल्याने कर्मचारी कोणत्याही वेळेत ये-जा करतात. यंत्र चालू करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत.

गंगेची वाडी (पेण) येथे धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांना हिंदुत्वनिष्ठांनी रोखले !

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्त्यांवर गुन्हे नोंद होणारे कडक कायदे हवेत !

महाविकास आघाडीच्या काळातच ‘फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी विरोधी पक्षनेता असतांना टाटा एअरबस प्रकल्पाच्या प्रमुखांना प्रकल्पासाठी मी नागपूर येथील भूमी दाखवली.

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – चंदगड येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी

देशभरात वक्फ कायद्याच्या दुरुपयोगाने चालू असलेला ‘लँड जिहाद’च आहे. हा धार्मिक भेदाभेद करणारा, राज्यघटनाविरोधी काळा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी चंदगड येथे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ३१ ऑक्टोबरला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार रुग्णालयात भरती !

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ते २ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालयात उपचार घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.

केडगाव (जिल्हा पुणे) येथे राष्ट्रभक्तीचे कार्य करणार्‍या ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला !

या वेळी बोलतांना श्री. सुनील घनवट यांनी हलाल अर्थव्यवस्था देशासाठी कशी घातक आहे ? हे स्पष्ट केले. ते म्हणाले की, हलाल अर्थव्यवस्थेमधून उभा राहिलेला पैसा जगभरामध्ये अशांतता पसरवणे आणि इस्लामचा प्रसार यांसाठी वापरला जात आहे.

अभिनेत्री जुही चावला यांच्या मुंबईतील दुर्गंधीविषयीच्या ट्वीटला उपमुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री जुही चावला यांनी २ दिवसांपूर्वी ‘हवेत पुष्कळ दुर्गंधी पसरलेली आहे. आधी ती वांद्रे आणि वरळीजवळील भागातील खाडीच्या ठिकाणाहून जाताना जाणवायची. आता ती संपूर्ण दक्षिण मुंबईत पसरली आहे.

महागाव (यवतमाळ) येथे तोतया आधुनिक वैद्यांवर कारवाई

तालुक्यातील काळी (दौ.) येथील समर बिस्वास या तोतया बंगाली आधुनिक वैद्यावर तालुका आरोग्य अधिकारी नरेंद्र जाधव यांनी कारवाई केली. पुढील कारवाईसाठी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.