एकनाथ शिंदे यांच्या गटातील सर्व आमदार आणि खासदार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देणार !

डावीकडून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे

मुंबई – शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील ४१ आमदार आणि १० खासदार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा कायम ठेवली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अभिनेता सलमान खान यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. अंबानी कुटुंबियांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली असून त्यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.