यवतमाळ बसस्थानकात सांडपाणी आणि घाणीचे साम्राज्य यांमुळे दुर्गंधी !

यवतमाळ बसस्थानक परिसरात साचलेले सांडपाणी

यवतमाळ, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील नवीन बसस्थानकाचे बांधकाम गत ४ वर्षांपासून चालू आहे. आर्णी मार्गावर उभारलेल्या तात्पुरत्या बसस्थानकात मात्र सांडपाणी येत असून घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असून या दुर्गंधीकडे परिवहन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

दिवाळीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांची गर्दी येथे होती; मात्र ‘तात्पुरते स्थानक म्हणून येथील सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे’, असे येथील स्थानिकांना वाटते.

संपादकीय भूमिका

प्रवाशांची हेळसांड करणार्‍या अशा कर्तव्यशून्य अधिकार्‍यांना प्रवशांनीच आता जाब विचारला पाहिजे !