पाकिस्तानी आतंकवाद्याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्यास नकार !

चीनची संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा आडकाठी !

न्यूयॉर्क (अमेरिका) – चीनने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानमधील आतंकवाद्याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यास नकार दिला. ‘लष्कर-ए-तोयबा’चा आतंकवादी शाहिद महमूद याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. चीनने आतापर्यंत ४ वेळा अशा प्रकारे पाकिस्तानी आतंकवाद्यांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यास नकार दिला. अब्दुल रहमान मक्की, अब्दुल रौफ, साजिद मीर आणि हाफिज सईद यांना ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्याला चीनने विरोध केला होता.

शाहिद महमूद याला वर्ष २०१६ मध्ये अमेरिकेने ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित केले आहे. महमूद बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांचे तळ, म्यानमार, सौदी अरेबिया, तुर्कीये आणि सीरिया अशा देशांमध्ये जाऊन लष्कर-ए-तोयबासाठी मुसलमान तरुणांची भरती करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच तो जून २०१५ ते जून २०१६ या काळात तोयबाला अर्थपुरवठा करणार्‍या ‘फलाह-ए-इंसानियत’ या संघटनेचा तो उपाध्यक्षही होता.

संपादकीय भूमिका

चीन स्वतः मात्र त्याच्या देशात जिहादी आतंकवादी निर्माण होऊ नयेत; म्हणून मुसलमानांना इस्लामपासून दूर नेण्यासाठी शिबिरात ठेवून त्यांच्यावर अत्याचार करत आहे !