देहलीमध्ये फटाक्यांची खरेदी-विक्री करणार्‍यावर बंदी

बंदीचे उल्लंघन केल्यास दंड आणि कारावास होणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – देहली राज्यामध्ये फटाक्यांची निर्मिती, संग्रह आणि विक्री करणार्‍यांना ५ सहस्र रुपयांचा दंड आणि ३ वर्षांपर्यंत कारावास अशी शिक्षा होऊ शकते, अशी माहिती देहलीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिली. जर कुणी फटाके खरेदी करतांना सापडला, तर त्याला २०० रुपयांचा दंड आणि ६ मासांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याच्या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी एकूण ४०७ पथके स्थापन करण्यात आली आहेत, असेही राय यांनी सांगितले.