एका अमेरिकी डॉलरसाठी मोजावे लागणार ८३ रुपये !

भारतीय रुपयाचे विक्रमी अवमूल्यन !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – भारतीय रुपयाचे अवमूल्यन होणे चालूच असून १९ ऑक्टोबर या दिवशी त्याने निच्चांक गाठला. एका अमेरिकी डॉलरमागे ८३ भारतीय रुपये मोजावे लागणार आहेत. विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय भांडवली बाजारात केलेल्या समभागांच्या विक्रीमुळे हे अवमूल्यन झाल्याचे सांगण्यात आले. १९ ऑक्टोबरच्या सकाळी शेअर मार्केट ८२.३२ रुपयांवर उघडले. त्यामध्ये ६१ पैशांची घसरण होऊन ८३.०१ रुपये प्रति डॉलरपर्यंत रुपयाचे अवमूल्यन नोंदवण्यात आले.