ब्रिटनच्या संसदेच्या परिसरात मेणबत्त्या पेटवून आणि प्रार्थना म्हणून साजरी झाली दिवाळी !

लंडन (ब्रिटन) – प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ब्रिटनच्या संसदेच्या परिसरात इस्कॉन मंदिराच्या पुजार्‍यांनी मेणबत्त्या पेटवून आणि प्रार्थना करून दिवाळी साजरी केली. (मेणबत्तीऐवजी पणत्या लावल्या, तर त्याचा आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो ! – संपादक) वेस्टमिंस्टर पॅलेसजवळील सभापतींच्या शासकीय कक्षामध्ये आयोजित दिवाळी कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते आणि इस्कॉनचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या वेळी हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांनी म्हटले की, मी जगातील सर्व समुदायांना दिवाळी शांततेत आणि आनंदाने साजरी करण्याची कामना करतो.