सतना (मध्यप्रदेश) येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरने औषधाच्या ‘प्रिस्क्रिप्शन’वर ‘श्री हरि’ लिहिण्यास केला प्रारंभ !

डॉ. सर्वेश सिंह(डावीकडे) ‘श्री हरी’ लिहलेल्या औषधाच्या चिठ्ठीसह

सतना (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकतेच राज्यातील वैद्यकीय शिक्षण हिंदीमधून चालू करण्याच्या कार्यक्रमात बोलतांना डॉक्टरांनी त्यांच्या औषधाच्या चिठ्ठीमध्ये (प्रिस्क्रिप्शनमध्ये) Rx ऐवजी ‘श्री हरि’ लिहिण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत सतना येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरने तशा प्रकारचे ‘श्री हरि’ लिहिण्यास प्रारंभ केला आहे. तशा प्रकारे लिहिलेली एक चिठ्ठी सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. डॉ. सर्वेश सिंह असे ते लिहिणार्‍यांचे नाव आहे.