खालच्या न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली !

१ वर्षाच्या लहान मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण !

नवी देहली – आपल्या एक वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी  आरोपीला दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला आरोपीने देहली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी निकाल देतांना देहली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांच्या खंडपिठाने निकाल देतांना म्हटले, ‘बलात्कार हा केवळ पीडितेसाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी निंदनीय आहे. अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्यांमध्ये विशेषकरून लैंगिक अत्याचारांमध्ये चिंताजनक वाढ होत असतांना न्यायालयांनी सुज्ञ कायदेशीर उपायांचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरते.’