रशियाने युक्रेनमधील ३० टक्के विद्युत् प्रकल्प केले नष्ट ! – झेलेंस्की

युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – रशियाने गेल्या ८ दिवसांमध्ये युक्रेनमधील ३० टक्के विद्युत् प्रकल्प नष्ट केले, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी केला आहे. त्यामुळे छोट्या शहरांपासून राजधानी कीवमधील मोठ्या इमारतींपर्यंत अनेकांचा विजपुरवठा खंडित झाला आहे.

रशियाने कीववर केलेल्या आक्रमणांमध्ये २ जण ठार झाले, तर शहरातील काही विद्युत् केंद्रे आणि जल प्रकल्प नष्ट करण्यात आले. किरिलो त्यमोशेन्को या झेलेंस्की यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार रशियाने केलेल्या ३ क्षेपणास्त्रांच्या मार्‍यामुळे कीवमधील महत्त्वपूर्ण विद्युत् प्रकल्पांची पुष्कळ हानी झाली आहे.