मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल केल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हे नोंद !

महाप्रबोधन यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल

ठाणे, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनिता बिर्जे, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, समालोचक सचिन चव्हाण यांच्यावर नौपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभागप्रमुख दत्ताराम गवस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाकरे गटाने ९ ऑक्टोबर या दिवशी महाप्रबोधन यात्रेचे आयोजन केले होते.