गुरुवारी उत्तररात्री नाथांची पहिली भाकणूक

श्री क्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी (जि. बेळगाव), १२ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र, कर्नाटक यांसह लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेस ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. ११ ऑक्टोबर या दिवशी कुर्ली मंदिरातून नाथांची पालखी सबीना आप्पाचीवाडी येथील घुमट मंदिराकडे रवाना झाली. यानंतर वाडा मंदिरातून नाथांची पालखी सबीनासह उत्सव मंदिराची प्रदक्षिणा झाली. उत्सव मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. १२ ऑक्टोबरच्या रात्री ढोल जागर, नाथांच्या दोन्ही पालख्यांचा सबीनासह खडक उत्सव, मंदिर प्रदक्षिणा, तसेच उत्सव मंदिरात पारंपरिक गझी खेळ होईल. १३ ऑक्टोबर या दिवशी उत्तररात्री नाथांची पहिली भाकणूक होईल.
१४ ऑक्टोबर या दिवशी महानैवेद्य, रात्री ढोल जागर, नाथांची पालखी सबिनासह उत्सव मंदिराची प्रदक्षिणा आणि उत्तररात्री नाथांची दुसरी भाकणूक होईल. १५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७ वाजता नाथांची घुमटातील भाकणूक, दुपारी ४ वाजता सबीनासह उत्सव मंदिराची प्रदक्षिणा, वाडा मंदिर आणि घुमट मंदिरातून कुर्लीकडे रवाना, तसेच रात्री कुर्ली मंदिरात पालखी पोचल्यावर यात्रेची सांगता होईल.
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी