
पलूस (जिल्हा सांगली) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पलूस येथे दसर्याच्या दिवशी काढलेल्या श्री दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवतीर्थ येथे श्री. पृथ्वीराज आणि सौ. विद्या सादूल यांनी ध्वजाला हार घालून औक्षण केले. त्यानंतर सामूहिक प्रार्थना होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. रोहित पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रेरणामंत्र म्हटला.



या कार्यक्रमासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, माजी सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. संग्राम देशमुख, धर्मप्रेमी श्री. विजय पाटील, श्री. गणेश बुचडे यांच्यासह ५०० हून अधिक धर्मप्रेमी, धारकरी उपस्थित होते.
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !