राज्यातील काही दूध संघांनी सरकारच्या अनुदानात अपहार केला ! – राधाकृष्ण विखे पाटील, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री

सरकार शेतकर्‍यांसमवेत असून आवश्यकता भासल्यास सरकार शेतकर्‍यांचे दूध विकत घेईल, असे प्रतिपादन राज्याचे पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते

संभाजीनगर येथे ‘पी.एफ्.आय.’ने घेतलेल्या कार्यक्रमांना पैसा देणार्‍या स्रोतांची कसून चौकशी चालू !

२७ सप्टेंबरच्या पहाटे अन्वेषण यंत्रणेने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत १४ जणांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्या वेळीही संभाजीनगर येथे संघटनेचे सर्वाधिक मोठे जाळे पसरल्याचे समोर आले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, ते आमच्याकडे आहे. या देशात जे काही निर्णय होतात ते घटना, नियम यांच्या आधारेच होत असतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून स्थगितीची मागणी फेटाळली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

नागपूर माहिती आयोगाने ३७ सहस्र प्रकरणे निकाली काढली 

पांडे म्हणाले की, माहिती अधिकार कायदा नागरिकांच्या हितासाठी आणण्यात आला आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दरी मिटवणारा असा हा कायदा आहे. त्याची प्रभावी कार्यवाही होणार आहे.

छगन भुजबळ यांनी क्षमा मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करू ! – उमा खापरे, महिला राज्य अध्यक्षा, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीदेवीच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या ‘भुजबळ फार्म’ येथे २९ सप्टेंबर या दिवशी धडक दिली आणि प्रवेशद्वारावर सरस्वतीची प्रतिमा ठेवून पूजन केले.

रायगडावर केले जाणारे पिंडदान हा हिंदु संस्कृतीचा भाग ! – रघुजीराजे आंग्रे (कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज)

रघुजीराजे आंग्रे म्हणाले, ‘‘राम धुरी आणि त्यांचे सहकारी यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी असलेल्या निष्ठेवर संशय घेणे अत्यंत चुकीचे आहे. गडासाठी आणि गडावरील लोकांसाठी त्यांनी केलेले काम विसरता येणार नाही.

सांस्कृतिक प्रसाराचे सूर !

एकीकडे श्री सरस्वतीदेवीच्या वीणेला सन्मानित करत असतांना महाराष्ट्रातील करंटे नेते मात्र ‘तिचे चित्रही शाळांमध्ये नको’, अशी बौद्धिक दिवाळखोरी व्यक्त करत आहेत. त्यांच्या विरोधामुळे देवी सरस्वतीचे चित्र शाळेतून हटणार नाहीच; उलट कालगतीनुसार वैश्विक स्तरावर तिचा जयजयकार होईल, हा या भव्य वीणेचा संदेश आहे !

हेदूळ ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावल्यानंतर शाळेला मिळाला शिक्षक  !

समस्या सहज सुटत असतांना प्रशासन जनतेच्या आंदोलनाची वाट का बघते ?

ख्रिस्ती पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री असल्याचा परिणाम !

आंध्रप्रदेशातील तिरुपतीमध्ये रस्त्याला लागून असणार्‍या भिंतीवर पूर्वी भगवान शिव, हनुमान आदी देवता यांची चित्रे रेखाटण्यात आली होती; मात्र आता त्यावर सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचा निळा, हिरवा अन् पांढरा रंग देण्यात आला आहे.

कोणताही आवडीचा पदार्थ अवेळी न खाता जेवणाच्या वेळीच खा !

‘आयुर्वेदाला चटपटीत आणि चवदार पदार्थांचे वावडे आहे का ? मुळीच नाही. उलट रुची घेऊन जेवल्याने समाधान मिळते. त्यामुळे पदार्थांच्या चवींमध्ये विविधता हवीच; परंतु एखादा पदार्थ कितीही आवडणारा असला, तरी तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाण्याला पुष्कळ महत्त्व आहे !