कोणताही आवडीचा पदार्थ अवेळी न खाता जेवणाच्या वेळीच खा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ६६

वैद्य मेघराज पराडकर

‘आयुर्वेदाला चटपटीत आणि चवदार पदार्थांचे वावडे आहे का ? मुळीच नाही. उलट रुची घेऊन जेवल्याने समाधान मिळते. त्यामुळे पदार्थांच्या चवींमध्ये विविधता हवीच; परंतु एखादा पदार्थ कितीही आवडणारा असला, तरी तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाण्याला पुष्कळ महत्त्व आहे. तसे केले नाही, तर त्याचा आज ना उद्या त्रास होणारच. ‘कोणताही आवडीचा पदार्थ पचत असेल, तर खाण्यास काहीच आडकाठी नाही; मात्र तो पदार्थ जेवणाच्या वेळेतच खावा. अवेळी खाऊ नये.’ हा नियम पाळल्यास शरीर निरोगी रहाण्यास साहाय्य होईल आणि साधनाही चांगली होईल.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०२२)