संभाजीनगर येथे ‘पी.एफ्.आय.’ने घेतलेल्या कार्यक्रमांना पैसा देणार्‍या स्रोतांची कसून चौकशी चालू !

संभाजीनगर येथे ‘पी.एफ्.आय.’ने घेतलेल्या कार्यक्रमांना पैसा देणार्‍या स्रोतांची कसून चौकशी चालू

संभाजीनगर – गेल्या काही दिवसांमध्ये देशविरोधी कारवायांचा आरोप ठेवून अटक करण्यात आलेल्या तरुणांकडून पी.एफ्.आय. संघटनेच्या पैशांच्या स्रोतांची चौकशी चालू झाली आहे. २२ सप्टेंबर या दिवशी शहरातून ४, तर जालना येथून एका व्यक्तीला अन्वेषण यंत्रणेने अटक केली होती. सध्या त्यांची पोलीस कोठडीत चौकशी चालू आहे. संभाजीनगर येथे झालेल्या कार्यक्रमांना पैसा कुणी पुरवला, व्यय आणि व्यवहार कसे पार पडले, याचे अन्वेषण चालू आहे.

२७ सप्टेंबरच्या पहाटे अन्वेषण यंत्रणेने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत १४ जणांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्या वेळीही संभाजीनगर येथे संघटनेचे सर्वाधिक मोठे जाळे पसरल्याचे समोर आले होते. सर्वप्रथम वर्ष २०२० मध्ये पी.एफ्.आय.वर ‘ईडी’ने टाकलेल्या धाडीत ४०० हून अधिक कागदपत्रे हाती लागली. त्यानंतर काही मासांतच त्यांचे प्रमुख बँक खाते गोठवले गेले; परंतु आता अन्वेषण यंत्रणेने देशविरोधी कारवायांचा ठपका ठेवून अटक केलेल्या ५ जणांकडून पैशांच्या मुख्य स्रोतांची चौकशी चालू आहे. १५ मार्च या दिवशी खाते गोठवल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले होते.